लोकमान्य टिळक: एक महान लोकनेता (Lokmanya Tilak: The Public Leader)

   रोगराई, पूरपरिस्थिती, बेरोजगारी याला जनता कंटाळलेली होती. त्यात पुन्हा इंग्रज येऊन राज्य करू लागले. आपल्या भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी खटपट केली. ते म्हटले जाते ना, 'होनी को कोई टाल नहीं सकता', याचा अर्थ जे होणार आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही. अशा वेळी इंग्रजांपासून लढण्यासाठी जणू देवाने ब्रम्हास्त्रच पाठवले. ते ब्रम्हास्त्र म्हणजे टिळक होय. हया ब्लॉग मध्ये मी टिळकांनी केलेले देशकार्य स्पष्ट करणार आहे. 
   23 जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी टिळकांचा जन्म झाला. त्यांना 'बळवंतराव' या नावाने हाक मारण्यात येऊ लागले. टिळक हे लहानपणापासूनच धाडसी व हुशार होते. त्यांच्या बुद्धिची चमक लहानापासूनच दिसुन येत होती. पण त्यांच्या बुद्धिची आणि हुशारीचे कौतुक करण्यासाठी आई या जगात नव्हती. टिळक दहा वर्षांचे असताना त्यांची आई देवाघरी गेली. 
    टिळकांच्या धाडसी वृत्तीचे एक गोष्ट तुम्हाला सांगतो. शाळेची मधली सुट्टी चालली होती. काही मुले ही शेंगदाणे खाऊन, शेंगदाण्याची टरफले वर्गातच टाकत होती. मधली सुट्टी संपताच शिक्षक वर्गात आले. शिक्षाकांनी ती टरफले पाहिली व ते पूर्ण वर्गाला विचारू लागले. कोणाचेही उत्तर न आल्याने गुरूजींनी छडी काढली आणि एका-एका मुलाला छडीने मारू लागले. अखेर टिळकांची वेळ ( पाळी ) आली. टिळक खंबीर पणे उभे राहून म्हणाले " मी टरफले टाकली नाहीत, मी मार खाणार नाही. " अशा प्रकारच्या टिळकांच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.
   टिळक जस जसे मोठे होत होते तसतसे त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होत होती. त्यांना सगळे काही समझत होते पण ते वयाने लहान असल्याने काहीच करू शकत नव्हते. पंधरा वर्षांचे असताना त्यांचे लग्न झाले. लग्न झाले असले तरी ते पुढचे शिक्षण घेत होते. त्यात अचानकच दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता सर्व जबाबदारी त्यांच्या डोक्यावर आली. लहान वयातच आईवडिलांचे निधन झाल्याने जणू डोक्यावरचे छप्परच निघून गेले.
   इंग्रज लोक भारतात आले पण भारतीय लोकांशी संपर्क साधावा म्हणजेच आपली ( इंग्रजांची ) भाषा भारतीयांना यावी आणि भारतीय लोक काय म्हणतात हे कळावे थोडकयात देवाणघेवाण व्हावी म्हणून इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण सुरू केले. पण टिळकांनी इंग्रजांचा हेतू ओळखला होता. इंग्रज भारतात आल्यावर स्वदेशी शिक्षणाची घडी विस्कटलेली होती. ती पुन्हा नीट करण्यासाठी ( व्यवस्थित ), टिळक , आगरकर यांसारख्या नेत्यांनी एकत्र येऊन १८८० मध्ये ' न्यू इंग्लिश स्कूल ' ची स्थापना केली. त्या शाळेत ते स्वतः शिकवत असत. एवढेंच करून ते थांबले नाहीत. आपले मत लोकांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी ४ जानेवारी १८८१ रोजी ' केसरी ' वृत्तपत वर्तमानपत्र काढले. काही दिवसातच 'मराठा' वृत्तपत्र काढले. १८८२ साली कोल्हापूरमधील प्रकरण केसरी वृत्तपत्राद्वारे उघकीस आणल्यामुळे त्यांना पहिला तुरुंगवास भोगावा लागला.तुरुंगवासातून बाहेर आल्यावर काही वर्षांनी त्यांनी लोकांनी एकत्र यावे आणि जनजागृती व्हावी  म्हणून १८९३ मध्ये सार्वजनिक गणेश उल्सवाला सुरुवात केली तसेच १८९४ मध्ये शिवजयंतीला सुरुवात केली .
   त्या काळात प्लेग महामारीने थैमान घातले होते. प्लेग हा रोग वाढतच चालला होता. त्यावेळी इंग्रज सरकारने लोकांच्या घरात जाऊन जुलूम केला. निरपराध लोकांना पकडून त्यांच्यावर छळ करत असत. हे सगळे पाहून टिळकांनी ' या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ' अशी टिका केली. चाफेकर बंधूंनी या अत्याचाराला जबाबदार असणारा अधिकारी रॅडची हत्या केली. मघाशी सांगितल्याप्रमाणे इंग्रज व्यापार करण्यासाठी भारतात आले होते. भारतातील कच्चा माल परदेशात  न्हायचे त्यावर प्रक्रिया करायचे आणि पुन्हा ते भारतात आणून विकायचे यात ते नफा मिळवायचे. हे सर्व पाहून टिळकांनी १९०६ साली स्वदेशी बाँबे स्टोअरची स्थापना केली.
   सरकारविरोधात होणारे हल्ले पाहून टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालवला. त्यात त्यांना ६ वर्षाची काळया पाण्याची शिक्षा झाली. कारागृहात असताना त्यांनी ' गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. तुरुंगात असताना त्यांना बातमी कळली की त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे . पत्नीचे निधन झाल्याने मुलाना कोण सांभाळणार म्हणून त्यांनी मुलांना पत्र लिहित असत. तुरूंगातून सुटल्यानंतरही त्यांनी देशकार्य सुरुच ठेवले. काही वर्षांतच शरीर थकले गेले. अखेर तो दुः खदायी दिवस उजाडला १ ऑगस्ट १९२० रोजी टिळक स्वर्गवासी झाले.
   मित्रांनो , हया २०२० रोजी टिळकांना स्वर्गवासी होऊन १०० वर्षे झाली आहेत . हा कोरोना महामारीने थैमान धातले असल्याने आपण घरीच बसून पुण्यतिथी साजरी करणार आहोत. पण मी म्हणतो दाखवण्यापूर्वी पुण्यतिथी का साजरी करावी? म्हणजे मला म्हणायचे आहे की त्यांचे जे विचार आहेत ते आपण आत्मसाथ करायचे. आता इकडे आपण म्हणतोय की स्वदेशी माल वापरावा आणि दुसरीकडे बाहेरच्या देशातल्या वस्तू वापराव्यात, याला काय अर्थ आहे. हा फक्त देखावाच आहे म्हणा. जरा टिळकांचा आदर्ष घ्या.
आज आपण पैसे - पैसे सतत करत असतो. हो की नाही.मी असं म्हणत नाही आहे की पैसे कमवू नका. मी म्हणत आहे की जास्त मोह करू नका. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे,

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
   सङ्गात् संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते !!
क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
   स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति !!

 अर्थ-  विषयांचं चिंतन करणाऱ्याला विषयांबद्दल आसक्ती निर्माण होते, आसक्ती मुळे काम निर्माण होतो, कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो, क्रोधामुळे मोह उत्पन्न होतो, मोहापासून स्मृतीभ्रंश होतो, स्मृतीभ्रंश झाला की बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाचा विनाश होतो !!

 शेवटी मी म्हणेन की काहीतरी देशासाठी करा. ज्यामुळे तुमच्या आयुष्याचे सार्थक होईल.




Share to your friends.

Click on the follow button above.






























(सुचना-मी ही माहिती विविध प्रकारच्या पुस्तकातून, वृत्तपत्रातून मिळवली आहे.
कोणालाही इजा पोहोचेल असा माझा अजिबात हेतू नाही.)


Comments

Post a Comment