Mission Chandrayan-1 ( मिशन चांद्रयान-१ )

   मित्रांनो, आपण घराबाहेर जाऊन डोके वर करुन पाहिले की आपल्याला आकाश दिसते . आकाशाच्या पुढे( वर ) पूर्ण ब्रम्हांड आहे. ब्रम्हांड म्हटले की त्यात आपल्या पृथ्वीसह अनेक ग्रह, तारे, दिर्घिका, आकाशगंगा, धूमकेतू हे सर्व येतात. मग हया सर्व ब्रम्हांडाचा अभ्यास करण्यासाठी आणि नवनवीन शोध लावण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ रोकेट (अग्निबाण) अंतरिक्षमध्ये सोडतात. जगामध्ये अनेक देश हे हया ब्रम्हांडाचा अभ्यास करण्यासाठी आपआपल्या अंतरीक्ष संस्थेच्या माध्यमातून स्पर्धेत उतरलेले असतात.  [अमेरिकेची नासा (NASA ) , रशियाची रोस्कोस्मॉस (Roscosmos )]. अशीच एक स्वदेशी म्हणजे आपली भारतीय अंतरिक्ष संस्था आहे. इस्त्रो( भारतीय अंतराळ संशोधन संस्था ) हे तीचे नाव. मित्रांनो, इस्त्रोने अनेक मिशन ( कामगिरी ) यशस्वीरीत्या पार पाडून भारताचे नाव जगभरात प्रसिद्ध केले आहे. अशाच एका यशस्वी कामगिरीची गोष्ट म्हणजेच 'चंद्रायान -१'.
   चंद्रयान -१ चे २००८ साली जरी प्रक्षेपण ( लाँच ) केल असले, तरी त्याची सुरूवात खरी २००३ सालीच झाली. जेव्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ओगस्त २००३ रोजी चंद्रयान -१ ची घोषणा केली. त्या काळी जी. माधवन नायर है इस्त्रो चे अध्यक्ष होते. अंदाजे ₹ 3८५ करोड ( US $५४ दक्षलक्ष ) येवढा प्रकल्पासाठी खर्च आला.
   अखेर तो दिवस आला, ज्यावेळी चंद्रयान -१ ला प्रक्षेपित करायचे होते. दिनांक २२ अक्टोबर २००८, वेळ १२:५२ यु.टि.सी. चंद्रयान -१ ला सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून ( श्रीहरीकोटा ) प्रक्षेपित प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपित करताना चंद्रयान -१ चे वजन जवळ- जवळ १३८३ कि.ग्राम येवढे होते.
   चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे . त्यांचा व्यास ( Diameter ) 3,474.2 येवढा आहे. पृथ्वीशी तुलना करता तर तो पृथ्वीच्या तीन पट लहान आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यात 3,84,400 किमी येवढे अंतर आहे. आता हे का आपण बोलत आहे कारण खगोलशास्त्रज्ञांना या सर्वाचा विचार करूनच रोकेट अंतराळात सोडावी लागतात एका छोटया आकड्यांमध्ये जरी चूक झाली तरी चंद्रयान कोठेही अवकाशात भटकू शकते.
   दिनांक १४ नोव्हेंबर २००८ इम्पॅक्टर आँर्बिटरपासून वेगळा झाला. आणि भारत चौथा देश बनला जो यशस्वीरीत्या चंद्रावर पोहोचू शकला. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो चंद्रयान -१ च्या वेळी फक्त आँर्बिटर वापरला गेला आणि चंद्रयान -2 च्या वेळी आँर्बिटरबरोबरच, लैंडर चा वापर करण्यात आला. ऑर्बिटर हा त्या ग्रहाच्या भोवती प्रदक्षिणा करत माहिती देत असतो, जो त्या आँर्बिट मध्ये फिरत असतो. लैंडरच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या त्या ग्रहावरे लैंड(land) केले जाते. रोवर हा त्या ग्रहावर फिरू शकतो व फोटोच्या किंवा  टेस्टिंग च्या माध्यमातून माहिती पृथ्वीवर पृथ्वीवर पाठवतो.
   येवढा खर्च करून चंद्रयान अवकाशात पाठवले हे तर खरं आहेच म्हणा, पण या मिशनचा उपयोग काय झाला? मित्रांनो, उपयोग झाला. हि भारताची चंद्रमोहीम यशस्वी झाली. चंद्रावर पाणी असल्याचा दावा इस्रो ने केला. हाँ, हे खरं आहे. काही दिवसाच नासा ने सुद्धा पाणी असल्यांची पुष्टि केली.
   पण अचानक २००९  साली भारतीय अंतराळ यानाशी झालेला संवाद अचानक गमावला गेला(संपर्क तुटला). 
नंतर प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून दिसून आले की एमडीआय व्दारे केलेला वीजपुरवठा पुरवठा जास्त झाला,त्यामुळे संपर्क गमावला गेला असावा.जरी मिशन कालावधी 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा असला तरीही त्याने प्राथमिक उद्दीष्टे पूर्ण केली आहेत. अश्या प्रकारे चंद्रयान १ ने इस्त्रो चे तसेच भारत देशाचे नाव जगभरात उज्ज्वल (प्रसिध्द) केले. 



Comments

Post a Comment