गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः...

       
          गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
       गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।
हा श्लोक तुम्ही नक्की ऐकला असणार याचा अर्थ -गुरू ब्रम्हा ( सृष्टिकर्ता ) समान आहे. गुरु विष्णू ( संरक्षक ) समान आहे. गुरु प्रभू महेश्वर समान आहे. गुरु साक्षात सर्वोच्च ब्रम्ह आहे. त्या गुरूला मी नमन ( नमस्कार ) करतो. श्लोकामध्ये गुरुला ब्रम्हा समान म्हटले आहे कारण ब्रम्हा हा सॄस्ष्टिचा निर्माता आहे. त्याच प्रमाणे शिक्षक हे मुलांमध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करतात. नंतर गुरुना विष्णू समान मानले आहे कारण शिक्षक हे मुलांना नकारात्मक प्रभावापासून रक्षण करत असतात. शास्त्रांमध्ये 'गु' चा अर्थ अज्ञान आणि 'रू' चा अर्थ  निरोधक म्हणजेच जो अज्ञान दूर करून जो प्रकाशाकडे घेऊन जातो.
गुरू कोणाला म्हणतात?
गुरू कोणाला म्हणतात ते एका श्लोकामधून सांगू इच्छितो:-
निवर्तयत्यन्यजनं प्रमादतः स्वयं च निष्पापपथे प्रवर्तते ।
 गुणाति तत्त्वं हितमिच्छुरंगिनाम् शिवार्थिनां यः स गुरु र्निगद्यते ॥
 जो दुसऱ्यांना प्रभाव ( हयगय ) करण्यापासून थांबवतो, जो स्वतः चांगल्या मार्गाने ( निष्पाप ) चालतो, जे हित आणि कल्याणाची इच्छा बाळगतात त्यांना तत्वबोध करतो, त्यांना  गुरू म्हणतात.
गुरू किती प्रकारचे असू शकतात?
शिक्षक हे एकच गुरू नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे गुरु असू शकतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे गुरु म्हणजे काय ? ज्यांच्याकडून आपण काही ना काही चांगल्या गोष्टी शिकत असतो. ते सर्व आपले गुरुच असतात. उदा. मुंग्याची रांग आपण पाहिलीच असले. मुंग्या ह्या कधीही एका रांगेत चालत असतात. या उदाहरणावरून आपण काय शिकले? रांगेत चालणे.
          प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । 
         शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥
प्रेरणा देणारे , सूचक देणारे , खर सांगणारे, मार्ग दाखवणारे, शिक्षा देणारे आणि बोध करणारे हे सगळे गुरू समान असतात.
गुरूपौर्णिमा:-
आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. व्यासांनी लोकांना वेदांचे धडे दिले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांचा अंश मानून गुरुंची पूजा केली जाते. त्यामुळेच तर गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

शिक्षक दिन-
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती. यांच्या जन्मदिवाशी शिक्षक दिवस साजरा केला जातो. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन एक महान शिक्षक होते. ते म्हणायचे 'बिना शिक्षा के इंसान कभी भी मंजिल तक नही पहुच सकता'.
भारतात शिक्षक दिवस मोठया प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मुले शिक्षक बनून वर्गात शिकवतात.म्हणजे आपण असे म्हणू शकतो की लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
     जसे शिल्पकार दगडाचे चांगले शिल्प तयार करतो, जसे कुंभार माती पासून मातीचे चांगले भांडे घडवितो. त्याचप्रमाणे शिक्षाक (गुरू) हा मुलांना घडवत असतो.शेवटी मी असे म्हणेन की 
       किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च ।
    दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम् ॥

Comments

  1. पुढील ब्लॉग कोणत्या विषयावर हवा,कॉमेंट करुन नक्की सांगा.


    या ब्लॉगची लिंक- http://for03you.blogspot.com/2020/09/blog-post.html?m=1

    ReplyDelete

Post a Comment