असे हे माझे गाव..... (कविता २)


 असे हे माझे गाव.....||धॄ||


सह्याद्रीच्या कुशीत वसलेले

निसर्गाने नटलेले

आणि डोंगरांनी सजलेले

असे हे माझे गाव.....||१||


वाऱ्याच्या झुळका बरोबर

ओहोळ-झरे वाहणारे

सर्व सुख सोयी असणारे

असे हे माझे गाव.....||२||


तंटामुक्त असणारे

मदतीस धावणारे

सण उत्सव एकत्र साजरे करणारे

असे हे माझे गाव.....||३||

Comments