तुम्ही हे सर्व कसे काय करता बाबा? (कविता ३)

तुम्ही हे सर्व कसे काय करता बाबा? ||धॄ||

माझे सर्व हट्ट पुरविता

माझ्यासाठी झटता

माझा रोज अभ्यास घेता

तुम्ही हे सर्व कसे काय करता बाबा? ||१||


रोज सकाळी उठून कामाला जाता

सुट्टीच्या दिवशी मला फिरायला नेता

माझ्याबरोबर खेळता

बाजारातले सामान सुद्धा तुम्हीच आणता

तुम्ही हे सर्व कसे काय करता बाबा? ||२||


घरातल्या कामामध्ये आईला मदत करता

प्राणीमात्रांची दया करता

लोकांनासुद्धा मदत करता

तुम्ही हे सर्व कसे काय करता बाबा? ||३||


Comments