|| मम्मी गं मम्मी || (कविता १)


मम्मी गं मम्मी 
    माझी मम्मी.....
मम्मी गं मम्मी 
    माझी मम्मी.....।।धृ ।। 

उठून सकाळी
    चहा भाकर देई 
आम्ही शाळेत जाण्यासाठी 
    करत असे घाई ||१|| 

सकाळ संध्या-काळ
    करत असे काम 
मुलांच्या भवितव्यासाठी
    गाळत असे घाम ||२||

काम करुन 
    नेहमीच थकत असे 
पण काय करणार ?
    काम कधीच संपत नसे ||३||

मम्मी गं मम्मी 
    माझी मम्मी.....
मम्मी गं मम्मी 
    माझी मम्मी.....

                        - कौस्तुभ प्रभु






























































(लहानपणापासून आपण कविता ऐकत आलो आहोत, पण कधी त्या कविता अनुभवल्या आहेत का? कविता नुसत्या वाचू नका, कविता अनुभवा नक्कीच तुम्हाला आवड निर्माण होईल. कविता आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.)

Comments

  1. पुढील ब्लॉग कोणत्या विषयावर हवा आहे, कमेंट करुन नक्की सांगा.

    ReplyDelete

Post a Comment