सौंदर्य तुझ्या रुपाचे
चित्ताला मोहले ।
धरती मातेसह राहण्यास
तुला का आवडले? ।।१।।
दोन आठवड्याच्या पंधरवड्यामध्ये
रुप बदलतोस खुप वेळा ।
धरती मातेला नमन करुन
चक्कर मारतोस किती वेळा? ।।२।।
रात्रीच्या चांदण्यामध्ये
तु दिसतोस का रे वेगळा ।
संबंध धरती मातेशी
असा कसा आगळा-वेगळा? ।।३।।
धरतीच्या कक्षेबाहेर
तुला फेकले गेले असते ।
प्रकॄतिचे नियम त्यावेळी
बदलतील का रे सगळे? ।।४।।
- कौस्तुभ प्रभु
Comments
Post a Comment